सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना आपल्या शरीराकडे नीट लक्ष देता येत नाही. त्यामुळे लठ्ठपणा, शरीराची चरबी वाढते. मग पुन्हा वजन कमी करण्यासाठी अनेकजण व्यायाम, डाएट करतात. परंतु तरीही वजन कमी होत नाही. वजन कमी करण्याचे अनेक उपाय आहेत. तुम्ही व्यायाम न करताही वजन कमी करु शकता. त्यासाठी काही घरगुती उपाय आहेत.
– रात्री झोपण्याआधी एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा मेथी भिजत घाला. ही मेथी रात्रभर पाण्यात भिजू द्या. सकाळी हे पाणी गाळून घ्या. त्यानंतर हलकं कोमट करा. नंतर हे पाणी प्या. यामुळं वजन कमी होण्यास मदत होईल. शिवाय गॅस आणि अॅसिडिटीपासूनही तुमची सुटका होईल.
– तेजपत्ता तुम्हाला माहितीच असेल. सुरूवातीला एक ग्लास पाणी घ्या अन् ते गरम करा. आता त्यात एक-दोन तमालपत्र टाका. नंतर हे पाणी दोन मिनिटं झाकून ठेवा. आता हे ड्रिंक गाळून गरम चहासारखं प्या. या पाण्याच्या सेवनामुळे पोट आणि पचनाशी संबंधित समस्या दूर होतील आणि वजनही कमी होईल.
– ओवा वजन कमी करण्यास खूप मदत करतो. आधी एक ग्लास पाण्यात एक छोटा चमचा ओवा भिजवा. हे रात्रभर भिजू द्या. सकाळी उठल्यावर हे पाणी गाळून रिकाम्या पोटी याचं सेवन करा. यामुळे वजन झटपट कमी होण्यास मदत होईल. तसेच गॅस, अॅसिडिटी किंवा पचनाशी संबंधित समस्या दूर होतील.