लसणाचे तेल केसांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. लसणाच्या तेलामध्ये अँटी-व्हायरल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात, त्यामुळे केसांमध्ये डँड्रफ होत नाही. तसेच केसातील डँड्रफची समस्या त्वरित कमी होते. केस वाढीसाठी लसणाचे तेल फायदेशीर आहे. लसणाचे तेलतेल नियमितपणे केसांना लावा आणि टाळूला हलक्या हातांनी मसाज करा.जाणून घ्या केसांसाठी लसणाचे तेल कसे बनवावे –

लसणाचे तेल बनविण्याची पद्धती

पॅनमध्ये एक चमचा लसूण पेस्ट टाकून थोडी गरम करा. यानंतर या पेस्टमध्ये एक कप खोबरेल तेल घाला. आता हे तेल काही वेळ गरम करा. लसणाचा रंग हलका तपकिरी झाला की गॅस बंद करा आणि तेल थंड होण्यासाठी ठेवा. नंतर तेल थंड झाल्यावर गाळून बरणीत भरा.