ओले खजूर वाळल्यानंतर त्याचे रुपांतर खारीकमध्ये होते. खजुराप्रमाणेच खारीक देखील शरीरासाठी लाभदायक आहे. खारीकमध्ये प्रोटीन, कॅलरीज, कार्बाेहायड्रेट, फायबर, साखर यांसारखे पौष्टिक घटक असतात. जाणून घ्या खारीक खाण्याचे फायदे –

झटपट ऊर्जा मिळते
अशक्तपणा जाणवत असलं तर खारीक खा. खारीक खाल्ल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळते.

हाडे मजबूत आणि बळकट होतात
खारीकमध्ये फॉस्फरस, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम असे घटक असतात. नियमित खारीक खाल्ल्याने हाडे मजबूत आणि बळकट होतात.

रक्त वाढ होण्यास मदत करते
नियमित खारीक खाल्ल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. ऍनेमिया कमी होतो.

त्वचेच्या आरोग्यासाठी गुणकारी
निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी खारीक हे वरदान आहे. खजूरमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट घटक असतात जे त्वचेला तरुण तर ठेवतातच शिवाय त्वचेच्या इतर समस्यांपासून दूर ठेवण्याचे काम करतात.

केसांच्या आरोग्यासाठी गुणकारी
खारीकमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन असते. यामुळे केस गळती कमी होऊन केसांची वाढ होण्यास मदत होते.

पोटाचे आरोग्य सुधारते
खारीकमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्याने पचनसंस्था व्यवस्थित राहते. पचनसंस्थेशी संबंधित समस्या असतील तर खारीक नियमितपणी खावी.

स्मरणशक्ती वाढते
खारीकमध्ये असणारे कोलीन व व्हिटॅमिन बी स्मरणशक्ती आणि मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी खूप फायदेशीर असतात.