देशात 1 मे पासून 18 वर्षांपुढील सर्वांना कोरोना लस दिली जात आहे. कोरोना लस घेण्यासाठी नोंदणी करणे आवश्यकक आहे. परंतु ही नोंदणी कुठे आणि कशी करायची हे अनेकांना माहित नाही. कोरोना लस घेण्यासाठी नोंदणी कशी करायची याच्या सोप्या टिप्स…
अशी करा लसीकरणासाठी नोंदणी?
– सर्वप्रथम cowin.gov.in या संकेतस्थळावर जा आणि तुमचा मोबाईल नंबर टाका.
– त्यानंतर तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी दिलेल्या जागेत भरा आणि Verify वर क्लिक करा.
– तुमचा ओटीपी व्हॅलिडेट झाल्यानंतर व्हॅक्सिनसाठीच्या नोंदणीचं पेज उघडेल. तिथे तुम्ही तुमची माहिती भरा आणि Register वर क्लिक करा.
– मग तुम्हाला मोबाईलवर नोंदणी यशस्वी झाल्याचा मेसेज येईल. नोंदणी झाल्यावर तुम्हाला अकाऊंट डिटेल्स दाखवले जातील. या पेजवर तुम्ही लसीकरणासाठीची अपॉइंटमेंट निवडू शकता.
– तुम्ही एका मोबाईल क्रमांकावर 4 जणांची लसीकरणासाठी नोंदणी करू शकाल. परंतु त्यासाठी त्या सर्व सदस्यांची माहिती भरावी लागेल.
– शिवाय तुम्हाला आरोग्य सेतू मोबाईल अॅपवरही लसीकरणासाठी नोंदणी करता येईल. त्यासाठी अॅपवर स्वतंत्र लिंक देण्यात आली असून तिथे नोंदणीसाठी तुम्हाला तुमचं नाव, वय, लिंग अशी माहिती भरून नोंदणी करता येऊ शकेल.