ब्रोकोलीमध्ये प्रथिने, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट, लोह, व्हिटॅमिन ए, सी आणि इतर अनेक पौष्टिक पदार्थ आढळतात. ब्रोकोली शरीराला अनेक आजारांपासून वाचवू शकते. आरोग्याच्या दृष्टीने ब्रोकोली खाणे फायदेशीर आहे. जाणून घ्या ब्रोकोली खाण्याचे फायदे
शारीरिक आणि बौद्धीक वाढ होते
ब्रोकलीमध्ये आढळणारे लोह, फोलेट मुलाच्या मेंदू आणि शारीरिक विकासासाठी मदत करतात.
रक्तदाब नियंत्रित राहतो
ब्रोकलीचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो.
रक्त शुद्ध होते
ब्रोकलीचे सेवन केल्याने रक्त शुद्ध होण्यास मदत होते.
हाडे मजबूत बनतात
ब्रोकलीमध्ये भरपूर कॅल्शियम असते, ब्रोकलीचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात.
पोटाचे आरोग्य चांगले राहते
ब्रोकलीमध्ये भरपूर फायबर असतात. त्यामुळे पचनसंस्था सुरळीत राहते. पोटाचे विकार होत नाहीत.
मधुमेहींसाठी गुणकारी
ब्रोकोली खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
वजन कमी होते
ब्रोकोलीमध्ये असलेले फायबर आणि पोटॅशियम वजन कमी करण्यास मदत करतात.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर
मोतिबिंदू, काचबिंदू यापासून बचाव होण्यासाठी नियमित ब्रोकोली अवश्य खावी. ब्रोकोलीमध्ये बीटी केरोटिन मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होऊ शकते.
ह्रदयाचे आरोग्य चांगले राहते
नियमित ब्रोकोली खाण्यामुळे ह्रदयातील रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीत चालण्यास मदत होते. शिवाय यामुळे तुम्हाला ह्रदयविकार होण्याचा धोकाही कमी होतो. ब्रोकोलीमधील पोटॅशियममुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते.