कोरोनामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे? मग हे लक्षात ठेवा
कोरोनाचं संकट त्यात लॉकडाऊन यामुळे माणसाच्या मनाची अवस्था बिघडत आहे. त्यातच कोरोनाची दुसरी लाट भयंकर असून होणाऱ्या मृत्यूच्या बातम्यांमुळे भीती, चिंता आणि तणाव निर्माण होत आहे. त्यामुळे परिस्थिती बिघडत चालली आहे. अशात आपण सकारात्मक राहिले पाहिजे. त्यासाठी काही टिप्स…
*ध्यान करा-
तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा ध्यान करा. ध्यान करण्याचे अनेक फायदे आहेत. ध्यान केल्याने मन शांत आणि निरोगी राहते. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते. ध्यान केल्याने आपण शांत आणि आनंदी राहतो. ध्यान कसं करायचं हे माहित नसल्यास तुम्ही मोबाईलचा वापर करू शकता. त्यावर ऑनलाईन ध्यान कसं करायचं हे पाहू शकता.
*मित्रांशी आणि कुटुंबाशी कनेक्ट रहा-
जर तुम्हाला या काळात एकटेपणा जाणवत असेल तर आपल्या मित्रांनी, कुटुंबियांशी कनेक्ट राहा. त्यांना व्हिडिओ कॉल करून तुम्ही, ऑनलाईन चॅट करून त्यांच्याशी कनेक्ट राहा. त्यांच्याशी संवाद साधा. संवाद साधल्याने एकटेपणा दूर निघून जातो.
*छंद जोपासा-
तुम्हाला जर एखादा छंद असेल तर तो जोपासा. जसं की कोणाला गाणं गायला आवडतं तर कोणाला पुस्तकं वाचन करण्याची आवड असते. यापैकी कोणताही छंद तुम्ही जोपासू शकता. त्यात आपलं मन गुंतवू शकता.
*चांगली झोप घ्या-
झोप हा सर्वांच्या आवडीचा विषय आहे. या काळात चांगली झोप घ्या. शरीराला आराम द्या. चांगली झोप घेणे शरीरासाठी खूप आवश्यक आहे. सात ते आठ तास झोप घ्या. यामुळे आपली सकारात्मकता वाढण्यास मदत होईल.
*व्यायाम करा-
शरीरासाठी दररोज व्यायाम हा करायलाच हवा. तो आपल्या नित्यकर्माचा एक भाग असावा. त्यामुळे दररोज व्यायाम करा. व्यायाम केल्याने शरीरातील एंडोर्फिन बाहेर पडते, यामुळे सकारात्मकतेच्या भावनांना उत्तेजन मिळते.