सफरचंदांमध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स, न्यूट्रिएंट्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स घटक असतात. रोज एक सफरचंद खाल्ल्याने शरीराराला अनेक फायदे होतात. जाणून घ्या नियमितपणे सफरचंद खाण्याचे फायदे
वजन कमी होते
सफरचंदात आढळणारे फायबर दीर्घकाळापर्यंत पोट भरलेले ठेवण्यास मदत करते. सफरचंदातील फायबर पेक्टिन फायबरच्या स्वरूपात आढळते. हे फायबर शरीरातील अतिरिक्त चरबी शोषण्यास मदत करते.
पचनसंस्था सुधारते
सफरचंदामध्ये फायबर असल्याने पचनसंस्थेचे कार्य सुरळीत चालते.
हाडे मजबूत होतात
सफरचंदामध्ये आढळणारे फॅव्हनॉइड फ्लोरिझिन हाडांचे आरोग्य सुधारते. त्यामुळे हाडे मजबूत होतात.
मधुमेहाचा धोका कमी होतो
सफरचंद खाल्ल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो. यामध्ये असलेले फायबर खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते. सफरचंद मधुमेहाची पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.