शारीरिक आरोग्यासाठी हळद गुणकारी आहे. त्याचप्रमाणे त्वचेचे सौंदर्य खुलवण्याचे आणि आरोग्य सुधारण्याचे काम हळद करते. ड्रायस्कीनला मॉयस्चराइझ करणे गरजेचे असते. त्यासाठी हळदीमध्ये विविध पदार्थ मिसळून फेसपॅक बनवता येतात. जाणून घ्या ड्रायस्कीनसाठी हळदीचे फेसपॅक कसे बनवायचे याविषयी माहिती
१) दही आणि हळद फेसपॅक (Yogurt and turmeric facepack)
१ चमचा दही घेऊन त्यात १ चमचा हळद टाकून मिक्स करा. हा बनवलेला फेसपॅक चेहऱ्याला लावा. सुकल्यांनंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोनदा करू शकता.
२) बेसन आणि हळद फेसपॅक (Besan and Turmeric Facepack)
२ चमचे बेसन आणि १ चमचा हळद घेऊन त्यात गुलाबपाणी, दूध किंवा साधे पाणी मिसळून घ्या. बेसन आणि हळद फेसपॅक चेहऱ्याला व्यवस्थित लावून घ्या. सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ चेहरा धुवून घ्या.
३) दुधाची साय, मध आणि हळद फेसपॅक ( Milk cream, honey and turmeric Facepack)
दुधाची साय, मध आणि हळद एकत्र करुन बनवलेला फेसपॅक चेहऱ्याला लावा. सुकल्यांनंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या.