मोहरीच्या तेलात (Mustard oil) अधिक पोषक तत्व असतात. मोहरीच्या तेलाचा खाद्यपदार्थांत वापर जास्त करून उत्तर भारतीय करतात. केवळ पदार्थ बनविण्यासाठीच नाही तर, आरोग्याच्या दृष्टीनेही मोहरी तेल फायदेशीर आहे. जाणून घ्या मोहरी तेलाचे आरोग्यवर्धक आणि सौंदर्यवर्धक फायदे
मोहरी तेलाचे आरोग्यवर्धक फायदे
शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकण्यासाठी उपयुक्त
मोहरीमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असल्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकण्यासाठी उपयुक्त ठरते.
रक्तप्रवाह सुधारतो
मोहरीच्या तेलाने मालिश केल्यास तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. त्यामुळे शरीर ऍक्टिव्ह राहते.
थंडीवर प्रभावी
मोहरी तेलातील गुणधर्म शरीरातील ऊर्जा आणि उष्णता वाढविण्यास मदत करतात.त्यामुळे थंडीच्या दिवसांत मोहरी तेलाचे अवश्य सेवन करावे.
सांधेदुखी, हाडांच्या दुखण्यावर गुणकारी
मोहरीचे तेल हे सांधेदुखी, हाडांचे दुखणे कमी करण्यासाठी प्रभावी आहे. नियमित स्वरूपात मोहरीच्या तेलाने मालिश केल्यास सांधेदुखी, हाडांचे दुखणे कमी होण्यास मदत होते.
मोहरी तेलाचे सौंदर्यवर्धक फायदे
त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर
मोहरीचे तेल उत्तम मॉईस्चराईजर आहे. यामुळे त्वचा अधिक तरुण, चमकदार आणि तुकतुकीत होते. शिवाय त्वचेचा कोरडेपणाही कमी होतो. मोहरी तेलाने त्वचेला मालिश केल्यास टॅनिंग दूर होण्यास मदत होते.
केसांच्या आरोग्यासाठी गुणकारी
आठवड्यातून एकदा ओहरीच्या तेलाने केसांना अवश्य मालिश करावी. यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होऊन केसांचे पोषण होते. केसांची वाढ होते तसेच केस अधिक मजबूत बनतात. मोहरी तेल फंगल इन्फेक्शनवर गुणकारी आहे. त्यामुळे केसांमढील डँड्रफ कमी होतो.
ओठ मुलायम आणि गुलाबी होतात
त्वचे प्रमाणेच ओठांसाठीही मोहरीचे तेल उत्तम मॉईस्चराईजर आहे. ओठ उकलले असतील तर मोहरी तेल लावावे. तसेच नियमितपणे मोहरी तेलाने ओठांची मालिश केल्यास ओठ मुलायम आणि गुलाबी होतात.