त्वचेला योग्य प्रमाणात मॉइश्चर न मिळाल्याने त्वचा कोरडी पडते. उन्हाळ्यात विशेषतः ही समस्या उद्धभवते. उन्हाळ्यात त्वचा कोरडी पडू नये किंवा त्वचा कोरडी पडली तर कोणती काळजी घ्यावी , घरगुती उपाय करावेत याविषयी जाणून घ्या –

कोरफड
कोरफड त्वचेतील आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करतं. रात्री झोपताना कोरफडीचा रस किंवा कोरफड जेल त्वचेला लावा.
ग्लिसरीन
दोन चमचे ग्लिसरीनमध्ये एक चमचा मध मिक्स करून चेहऱ्यावर लावा. पंधरा-वीस मिनिटांनी चेहरा धुवून टाका.
कोमट पाणी
हात-पाय धुताना किंवा अंघोळ करताना कोमट पाणी वापरा. अति गरम पाण्यामुळे त्वचा रुक्ष बनते.
खोबरेल तेल
रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला आणि हातापायाला खोबरेल तेल लावावे. खोबरेल तेलाने त्वचेचा रुक्षपणा कमी होतो.
मध व गुलाबपाणी
मध व गुलाबपाणी मिक्स करून चेहऱ्याला लावा. सुकल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका.