अवकॅडोमध्ये व्हिटॅमीन सी, व्हिटॅमीन बी 6, बी 12, व्हिटॅमीन ए, डी, के, ए, थायमिन, राईबोफ्लेविन आणि नियासीन तत्त्व भरपूर प्रमाणात असतात. अवकॅडो हा नोअनसॅचुरेटेड फॅटी एसिडचा सर्वात चांगला स्त्रोत आहे. यामध्ये शुगरची मात्रा खूप कमी प्रमाणात आढळते. सुपर फूड मानले जाणारे अवकॅडो वजन वाढवण्यासाठी आणि कमी करण्यासाठीही उपयोगी पडते. जाणून घ्या अवकॅडो खाण्याचे फायदे –
पचन जलद आणि व्यवस्थित होते
अवकॅडोमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असल्याने पचन जलद आणि व्यवस्थित होते.
ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते
मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी अवकॅडो खाणे लाभदायक आहे. अवकॅडो खाल्ल्याने ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते.
मुख दुर्गंधीची समस्या कमी होते
अवकॅडोमधील अँटीबॅक्टेरियल आणि अँंटीऑक्सीडंट फ्लेनाईडमुळे तोंडातील बॅक्टेरियांचा नाश होतो. त्यामुळे दात दुर्गंधी किंवा मुख दुर्गंधीचा त्रास जाणवत नाही.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक
अवकॅडोमधील ल्यूटीन आणि जियाजॅन्थीन नावाचे कॅरोटीनॉईड घटकांमुळे मोतीबिंदू आणि इतर डोळ्यांच्या समस्यांपासून बचाव होतो. तसेच दृष्टी देखील सुधारते.
त्वचेच्या आरोग्यासाठी लाभदायक
अवकॅडोमधील पोषक घटक त्वचा निरोगी आणि तरुण ठेवण्यास मदत करतात. अवकॅडोचा लेप बनवून चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील डाग निघून जातात.
केसांच्या आरोग्यासाठी लाभदायक
अवकॅडोमधील पोषक घटकांमुळे केस गळती कमी होते. केस निरोगी, दाट आणि चमकदार बनतात.