कडक उन्हाळ्यात वातावरणातील उष्णता वाढते. त्यामुळे घरात कूलर, फॅन, एसी यांसारख्या उपकरणांचा वापर करण्याकडे आजकाल सगळ्यांचाच भर आहे. मात्र याचे शरीरावर आणि वातावरणावरही दुष्परिणाम होत आहेत. तापमानाला कमी करण्यासाठी झाडे लावणे एक सोपा आणि चांगला मार्ग आहे. घरात थंडावा ठेवण्यासाठी काही वनस्पती उपयुक्त आहेत.
तुळस (Tulsi)
तुळस ही प्रदूषण नाशक आहे. तुळस २४ तास ऑक्सिजन आणि थंडावा देते. तुळशीमुळे वातावरणात अधिक प्रमाणात ऑक्सिजन पसरण्यास मदत होते. त्यामुळे अवतीभोवती वातावरण शुद्ध आणि स्वच्छ राहते. स्वच्छ वातावरणाचा अनुकूल परिणाम सर्वांच्याच मानसिकतेवर होतो. यामुळे नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता वाढीस लागते.
कोरफड (aloevera )
आयुर्वेदानुसार कोरफड ही अतिशय महत्वाची वनस्पती आहे. कोरफड घराचे तापमान कमी करण्यास मदत करते. तसेच कोरफड हा ऑक्सिजनचा एक चांगला स्रोत देखील आहे. कोरफड या वनस्पतीचा वापर अनेक औषधे, सौंदर्य प्रसाधने यांमध्ये होतो.
मनी प्लांट (Money plant)
हे शोभेचे झाड घरातील वातावरण थंड आणि शुद्ध बनवण्यासाठी उपयोगी आहे.
पाम (Palm)
कायम हिरवेगार राहणारी ही पाम्सची झाडं घरात थंडावा निर्माण करतात. या झाडांची जास्त देखभाल करावी लागत नाही.तसेच घर, बाल्कनी डेकोरेशनसाठी ही झाडे वापरली जातात.
रबर प्लांट (Rubber Plant)
ही वनस्पती घरातील हवा शुद्ध करण्याचे काम करते आणि प्रदूषण कमी करते. यासोबतच तुम्ही ज्या खोलीत ठेवता ती खोलीही थंड आणि ताजी ठेवते.घरात पैसे टिकवण्यासाठी या झाडाचं घरात असणं चांगलं समजण्यात येतं. धनलाभासाठी हे झाड घरात असू द्यावं असा एक समज आहे
गोल्डन पाथोस (Golden Pathos)
ही वनस्पती हवा शुद्ध करण्याचे काम करते. तसेच या वनस्पतीमुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि थंडावा राहतो.
स्नेक प्लांट (Snake Plant)
स्नेक प्लांटमुळे हवा शुद्ध राहण्यास आणि वातावरण थंड राहण्यास मदत होते. स्नेक प्लांट हे कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेणारं सर्वात चांगलं झाड आहे. हवेतील इतर प्रदूषणात्मक वायू आणि इतर टॉक्सिन्सदेखील हे झाड शोषून घेतं.
फिशटेल फर्न (Fish Tail Fern)
घरामध्ये शुद्ध हवा आणि थंडावा राहण्यासाठी या झाडाचा उपयोग होतो. लवकर वाढणार हे झाड एव्हरग्रीन आहे. या झाडाची शेपटी माशाप्रमाणे असते. त्यामुळे याला फिशटेल फर्न असं म्हणतात.