आंबा खाल्ल्यानंतर काही ठराविक पदार्थ खाऊ नयेत. कारण आयुर्वेदानुसार विरुद्ध चवीचे खाणे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. जाणून घ्या आंबा खाल्ल्यानंतर कोणते पदार्थ खाऊ नयेत तसेच त्याचे शरीरावर कोणते परिणाम होतात –
दही
दही थंड आणि आंबा उष्ण असतो. त्यामुळे या दोघांना एकत्र खाणं आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे शरीरात सर्दी आणि उष्णता निर्माण होते. दही आणि आंबा एकत्र खाल्ल्याने त्वचेशी संबंधित समस्या निर्माण होतात.
कारलं
आंब्यानंतर कारलं खाल्यामुळं तुम्हाला मळमळ, उलटी आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
मसालेदार पदार्थ
आंबा खाल्यानंतर कधीच मसालेदार पदार्थांचे सेवन केल्यास तुम्हाला पोटचे आरोग्य बिघडू शकते. त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
कोल्ड ड्रिंक्स
आंबा खाल्यानंतर कोल्ड ड्रिंक्स पिऊ नये. कारण, आंब्यात गोडाचं प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळं आंबा खाल्यानंतर तुम्ही कोल्ड ड्रिंकचं सेवन केलं, तर त्यामुळं तुमच्या शरिरातील साखरेचं प्रमाण वाढू शकतं.
पाणी
कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर अनेकांना पाणी पिण्याची सवय असते. मात्र आंबा खाल्ल्यानंतर पाणी पिणे टाळावे.
आंबा खाल्यानंतर लगेच पाणी पिल्यास पोटदुखी, गॅस आणि ऍसिडिटी सारख्या समस्या उद्भवू शकतात.