जांभूळ हे फळ मधुमेह रुग्णांसाठी अतिशय गुणकारी आहे. जांभूळामध्ये लोह, कॅल्शियम, प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात असतात. चवीने गोड, थोडीशी आंबट व तुरट असणाऱ्या जांभूळाचे सरबतही चविष्ट आणि गुणकारी असते. जाणून घ्या जांभळाचे सरबत बनविण्याची रेसिपी
पद्धत १
साहित्य
दोन वाट्या पिकलेली काळी जांभळे, पाव वाटी साखर, मीठ, गरजेनुसार पाणी
कृतीप्रथम जांभळे धुवून, बिया वेगळ्या करून त्याचा गर काढून घ्या.
गर आणि थोडं पाणी मिक्स करून गॅसवर गरम करा.
२-३ मिनटे उकळल्यावर साखर घालून गॅस बंद करा.
मिश्रण थंड झाल्यावर त्यात मीठ टाकून मिक्सरला वाटून घ्या.
हे मिश्रण गाळून एका बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवा.
मिश्रणात थंड पाणी घालूनसरबत सर्व्ह करा.
पद्धत-२
साहित्य
१ किलो जांभळाचा गर, १ किलो साखर, ४ लिटर पाणी, २ ग्रॅम सायट्रीक अॅसीड
कृती
मोठी जांभळे घेऊन गर हाताने काढून बिया चोळून घ्या. एकजीव झालेला गर पातेल्यात २० मिनिटे गरम करावा.
साखर, सायट्रीक अॅसीड, पाणी व परिरक्षक योग्य प्रमाणात घेऊन रसामध्ये मिसळून घ्या.
नंतर हे मिश्रण गाळून घ्यावे आणि पुन्हा थोडेसे गरम करावे.
थंड झाल्यावर काचेच्या बाटलीत भरून ठेवावे.