उन्हाळ्यात अनेक जण कलिंगड खाण्याला पसंती देतात. कलिंगड खाल्ल्याने शरीरातील उष्णता कमी होते शिवाय शरीराला तात्काळ ऊर्जाही मिळते. कलिंगडापासून वेगवेगळे पदार्थ बनवता येतात. नुसते कलिंगड खाण्याचा कंटाळा आला असलं तर वेगळेपण म्हणून कलिंगडाची कुल्फीही बनवू शकता. जाणून घ्या कलिंगडाची कुल्फी बनविण्याची रेसिपी

साहित्य
कलिंगडाच्या २ फोडी, अर्धा पेला पाणी, पाव पेला नारळाचे दूध, २ चमचे साखर

कृती
कलिंगडाच्या फोडी करून त्यातील बिया काढा. आणि कलिंगडाचा गर मिक्सरला बारीक वाटून घ्या.
कलिंगडाच्या गरात नारळाचे दूध, साखर आणि पाणी मिक्स करून परत मिक्सरला वाटून घ्या.
तयार झालेले मिश्रण कुल्फीच्या भांड्यात ओतून फ्रिजरमध्ये ठेवून द्या.
५-६ तासानंतर कलिंगडाची कुल्फी तयार होईल.