फास्टफूड बिस्कीट, क्रीम्स, केक यांसारख्या पदार्थांच्या सेवनाने शरीरातील ‘व्हिटॅमिन-ए’चं (vitamin-A) प्रमाण घटत जातं. रातांधळेपणा, काचबिंदू, दृष्टी कमी होणे, त्वचा कोरडी पडणं, खरखरीत होणं, त्वचेवर सुरकुत्या येणे, हाडं ठिसूळ होणं, पाठीत बाक निर्माण होणे ह्या समस्या व्हिटॅमिन-ए चा अभाव असण्याची लक्षणे आहेत. या समस्यांपासून वाचण्यासाठी आहारात व्हिटॅमिन ए युक्त पदार्थ असणे गरजेचे आहे. साधारणपणे पिवळ्या, नारिंगी रंगाच्या सर्व पदार्थातून व्हिटॅमिन-ए मिळते.जाणून घ्या आहारात कोणत्या व्हिटॅमिन-ए युक्त पदार्थांचा समावेश करावा

 

भाज्या (Vegetables)
गाजर, टोमॅटो, लाल भोपळा, बीट, मूळा, टोमॅटो,रताळे, फरसबी, ब्रोकोली, मका, कांदा, काकडी, बटाटा,मोड आलेले कडधान्य आणि सर्व हिरव्या पालेभाज्या यातून व्हिटॅमिन-ए मिळते.

फळे (Fruits)
आंबा,पपई, अंजीर, द्राक्षे, पेरू, क्रेनबेरी, स्ट्रॉबेरी, कलिंगड, खरबूज, टरबूज, अननस, पपनस, आलुबुखार, केळे, खजूर, बेदाणा, चेरी, पेर, पीच, संत्री, सफरचंद यांसारखी फळे व्हिटॅमिन-ए चा मोठा स्रोत आहेत.

दूध आणि दुधाचे पदार्थ (Milk and milk products)
दूध, ताक, घरगुती चीज, घरचं लोणी, दही, पनीर, साय या पदार्थांतही मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन-ए असते.

प्राणिज स्रोत (Animal sources)
कॉड माशाचे तेल-लिवर, अंडी या प्राणिज स्रोतांमध्ये व्हिटॅमिन-ए चे प्रमाण सर्वात जास्त असते.

जाणून घ्या शरीराला थंडावा देणारे आणि पचनाच्या समस्या दूर करणारे कैरीचे पन्हे बनविण्याची रेसिपी