जिरे हा मसाल्यातील एक महत्वाचा पदार्थ आहे. जिऱ्याशिवाय भाजीची फोडणी होत नाही. जिऱ्यामुळे भाजीला उकृष्ट चवही येते. आपण जिऱ्याचे सेवन केवळ अन्न पदार्थांतच करतो. मात्र जिऱ्याचे पाणी पिणे देखील आरोग्यास लाभदायक आहे. जाणून घ्या जिऱ्याचे पाणी बनविण्याची पद्धत आणि जिऱ्याचे पाणी पिण्याचे इतर फायदे
जिऱ्याचे पाणी बनविण्याची पद्धत
एक चमचा जिरे एक कप भर किंवा ग्लासभर पाण्यात रात्री भिजवून ठेवा. सकाळी भिजवलेले जिरे उकळा आणि कोमट करून प्या. उरलेले जिरे चावून खा.
जिऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे
ऍसिडिटी दूर होते
आयुर्वेदानुसार जिरे पचनासाठी अत्यंत प्रभावी आहे. हे औषधी जिरे पाचक रस नियंत्रणात ठेवतात. त्यामुळे ऍसिडिटी आणि अपचनाचा समस्येपासून तुमचा फायदा होतो. जिऱ्याचे पाणी पिल्याने ऍसिडिटी दूर होण्यास मदत होते.
वजन, चरबी कमी होते
जिऱ्याचे पाणी नियमित प्यायल्यास अतिरिक्त चरबी कमी होते तसेच शरीरातील चरबी सुद्धा वाढत नाही.
कोलेस्ट्रॉल कमी होते
जिऱ्याचे पाणी नियमित सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
शरीरातील विषारी, घातक पदार्थ बाहेर टाकले जातात
जिऱ्याच्या पाण्याच्या सेवनामुळे शरीरातील विषारी, घातक पदार्थ बाहेर टाकले जाण्यास मदत होते.
( टीप : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या. माझं आरोग्य याची पुष्टी करत नाही. )
उन्हाळ्यात ‘या’ घरगुती पेयांच्या सेवनाने थकवा होईल तात्काळ दूर आणि शरीरालाही मिळेल थंडावा