कलिंगडमध्ये व्हिटॅमिन सी, ए, बायोटिन, अँटिऑक्सिडंट्स, झिंक, पोटॅशियम, इलेक्ट्रोलाइट्स आणि खनिजांसह अनेक पोषक घटक आढळतात. कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते आणि कमी कॅलरीज असतात, यामुळे कलिंगड तसेच कलिंगडाचे सरबत यांचे सेवन केल्याने वजनही कमी होण्यास मदत होते. जाणून घ्या कलिंगडाचे चविष्ट आणि आरोग्यदायी सरबत बनविण्याची सोपी पद्धत
पद्धत -१
साहित्य
२ कलिंगडाच्या फोडी, अर्धा ग्लास थंड पाणी, लिंबाचा रस, काळं मीठ, ५-६ पुदिना पानं, साखर
कृती
कलिंगडाच्या फोडी करून त्यातील बिया काढा.
कलिंगडाच्या फोडी, एक लिंबाचा रस, पुदिना, अर्धा चमचा काळं मीठ,साखर घालून मिक्सरने वाटून घ्या.
बारिक झालेल्या मिश्रणात पाणी घालून पुन्हा एकदा मिक्सरला लावून मिक्स करून घ्या. त्यानंतर गाळून घेऊन सर्व्ह करा.
पद्धत -२
साहित्य
कलिंगड, मीठ, दालचिनी पूड किंवा मिरपूड, साखर
कृती
कलिंगडाच्या फोडी करून त्यातील बिया काढा.
कलिंगडाचा गर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावा.
त्यात मीठ, साखर, दालचिनी किंवा मिरपूड घालून व्यवस्थित मिक्स करावे.
टीप : आवश्यकता असेल तरच साखर टाकावी. कारण जास्त गोड पदार्थ खाणे आरोग्यास उपयुक्त नाही तसेच गोड जास्त खाल्ल्याने वजन कमी होण्याची शक्यता कमी असते.
आरोग्यासोबत सौंदर्य वाढीसाठीसाठीही गाजरचा ज्युस उपयोगी, जाणून घ्या गाजरचा ज्युस पिण्याचे फायदे