उन्हळ्यात शरीर हायड्रेटेड राहणे आवश्यक असते. त्यासाठी तुम्ही विविध प्रकारची सरबत, ज्युस यांचा आहारात समावेश करू शकता. अनेक पोषक घटकांनी युक्त असणाऱ्या पेरूचे सरबत आरोग्यासाठी आणि चवीसाठीही उत्तम आहे. जाणून घ्या पेरुचे सरबत बनविण्याची पद्धती

साहित्य

एक वाटी पेरूच्या पिकलेल्या फोडी, एक लिंबू, सहा चमचे साखर एक लिटर पाणी, मीठ, चिमूटभर लाल तिखट

कृती

पेरूची वरची साल सोलरने काढून फोडी कराव्यात.
मिक्सरमध्ये पाणी, साखर आणि पेरूच्या फोडी फिरवून बारीक करून घ्याव्यात.
त्यांनतर हे मिश्रण गाळून घ्यावे.
नंतर त्या मिश्रणात लिंबाचा रस, मीठ, अगदी थोडं लाल तिखट आणि पाणी घालावे.
फ्रिजमध्ये थंड करून सर्व्ह करा.