उन्हाळ्यात द्राक्ष खाल्याने शरीराला चांगला थंडावा मिळतो. द्राक्षे तुमच्या शरीरातील प्रोटिन, फायबर, व्हिटॅमिन यांचे प्रमाण भरपूर वाढवून तुम्हाला उन्हळ्यात आजारांपासून दूर ठेवू शकतात. द्राक्षांप्रमाणेच द्राक्षांच सरबत देखील आरोग्यास उपयुक्त आहे. फक्त द्राक्षे खाऊन कंटाळा आला असलं किंवा द्राक्षे आवडत नसतील तर त्याला पर्याय म्हणून द्राक्षांच सरबत बनवू शकता. जाणून घ्या द्राक्षांच सरबत बनविण्याची पद्धत

साहित्य
अर्धी वाटी साखर, २ वाट्या काळी द्राक्ष, २ वाट्या हिरवी द्राक्ष (काळी किंवा हिरवी यापैकी एक प्रकारचीही कोणतीही द्राक्ष घेऊ शकता)
, मीठ, पाणी, अर्धा चमचा वेलची पावडर

कृती
मिठाच्या पाण्यात द्राक्षं दहा मिनिटं ठेवा नंतर स्वच्छ धुवून घ्या.
मिक्सरमध्ये किंवा ज्युसर जारमध्ये थोडं पाणी घालून द्राक्ष बारीक वाटून घ्या.
तयार झालेला गर गाळणीने गाळून घ्या.
त्या गरात तिप्पट पाणी घाला.
मीठ, साखर वेलची पावडर मिसळा.

उन्हाळ्यात अवश्य प्यावे करवंद सरबत, जाणून घ्या बनविण्याची सोपी पद्धत

चवीला आणि आरोग्यालाही भारी चिंचेचे सरबत, जाणून घ्या बनविण्याची सोपी पद्धत