चवीला आंबट गोड असणाऱ्या चिंचेमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. उन्हाळ्यात चिंच आणि चिंचेचे सरबत यांचा अवश्य आहारात समावेश करावा. जाणून घ्या चिंचेचा सरबत बनविण्याची सोपी पद्धती –

पद्धत – १

साहित्य – ३-४ चमचे चिंचेचा कोळ, बारीक केलेला गूळ, साखर, जिरे पावडर

कृती
आधी चिंच व्यवस्थित भिजवून घेऊन त्याचा कोळ काढून घ्या. एक ग्लास पाण्यात चिंचेचा कोळ आणि गूळ मिक्स करा. मिश्रण दाटसर बनण्यासाठी त्यात थोडी साखर टाका. मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या. नंतर त्यात थोडी जिरेपपूड टाका.

पद्धत – २

साहित्य – एक कप गूळ, अर्धा कप साखर, ३-४ चमचे चिंचेचा कोळ, चिमूटभर जीरं पावडर, चिमूटभरधने पावडर, चवीनुसार काळं मीठ, साधं मीठ

कृती
साखर आणि गुळात एक कप पाणी घालून तारी पाक करा. नंतर गॅस बंद करून त्यात चिंचेचा कोळ, जीरं पावडर, काळं मीठ, धने पावडर टाकून मिक्स करा. हे मिश्रण गार झालं की फ्रीजमध्ये ठेवा. सरबत करताना एक ग्लास थंड पाणी घेऊन त्यात २ ते ३ चमचे तयार मिश्रण घाला. बर्फ घालून सर्व्ह करा.

उन्हाळ्यात अवश्य प्यावे करवंद सरबत, जाणून घ्या बनविण्याची सोपी पद्धत

चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी करा ‘हा’ सोपा व्यायाम