दुधापासून बनविलेल्या चहापेक्षा कोरा चहा (Black Tea) शरीरासाठी जास्त उपयुक्त असतो. कोर्या चहामध्ये काॅफीच्या तुलनेमध्ये कॅफीनचे प्रमाण खूप कमी असते. तसेच दुधापासून बनविलेल्या चहाने ऍसिडिटी होण्याची शक्यता अधिक असते. ऍसिडिटीचा त्रास कमी करण्यासाठी आणि चहाची तलफ भागविण्यासाठी ब्लॅक टी पिण्यास सुरुवात करावी. जाणून घ्या ब्लॅक टी पिण्याचे फायदे
ताण-तणाव कमी होतो
ब्लॅक टी पिल्याने स्ट्रेस तयार होण्यासाठी कारणीभूत असलेल्या कार्टिसोल हार्मोनच्या प्रमाण कमी होते. त्यामुळे ताण-तणाव कमी करण्यास मदत होते.
शरीराला एनर्जी मिळते
ब्लॅक टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अँटी-ऑक्सिडेंट असते. जे शरीराला एनर्जी प्रदान करतात. त्यामुळे शरीर अधिक सतर्क आणि सक्रिय बनते.
त्वचेसाठी गुणकारी
ब्लॅक टीमध्ये असणार्या अँटी-अँटीऑक्सिडेंट गुणधर्मांमुळे चेहर्यावरील त्वचेमध्ये सुधारणा होऊन काळे डाग कमी-कमी होत जातात. ब्लॅक टी पिणे किंवा कापसाच्या तुकडा चहामध्ये बुडवून चेहर्यावर लावण्यामुळे त्वचा हेल्दी होईल. त्याचसोबत ती ग्लो देखील करायला लागेल.
सूज कमी होते
ब्लॅक टीमध्ये असणार्या घटकांमुळे शरीराच्या अंतर्गत अवयवांना आलेली सूज तसेच त्वचेला आलेली सूज देखील कमी होते.
रक्तप्रवाह सुधारतो
मेंदूच्या पेशी निरोगी ठेवण्यासोबतच त्यांच्यातील रक्तप्रवाह सुधारण्यासाठी ब्लॅक टी पिणे खूप उपयुक्त आहे.
पोटाच्या आरोग्यासाठी उपयुक्त
ब्लॅक टी मधील टॅनिनचे गुणधर्म आपल्या पचनसंस्थेला उपयुक्त आहेत. ब्लॅक टी अतिसार आणि गॅस यांसारख्या पोटाच्या समस्यांवर गुणकारी आहे.
चरबी कमी करण्यास मदत
दुधापासून बनविलेल्या चहामध्ये फॅट अधिक प्रमाणात असते. त्यामुळे शरीरात चरबी वाढू शकते. ब्लॅक टी पिल्याने शरीरात चहाद्वारे अतिरिक्त फॅट जाण्याचा प्रश्नच राहत नाही.
रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी करा ‘या’ पदार्थांचे सेवन
आरोग्यास हानिकारक ‘भेसळयुक्त हळद’ कशी ओळखावी, जाणून घ्या ट्रिक्स