कोरोनाची प्रमुख लक्षणे सर्दी, ताप, खोकला आहे. परंतु तुम्हाला ताप नसेल तर कोरोना झाला आहे की नाही हे कसं ओळखाल? तर त्याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

*डोळे लाल होणे-
चीनमध्ये एका अभ्यासातून असं समोर आलं आहे की, नव्या स्ट्रेनवर लक्ष दिलं गेलं तर कोरोना रूग्णामध्ये इन्फेक्शन दिसून येते. रूग्णाचे डोळे लाल दिसतात. तसेच रूग्णाच्या डोळ्यातून पाणी येते.

*सतत खोकला येणे-
जर सतत खोकला येत असेल तर कोरोना झाल्याचं समजू शकते.

*श्वसनाचा त्रास-
सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट आहे. या लाटेत अनेकांना श्वास घेण्याचा त्रास होत असल्याचं समोर आलं. विशेष म्हणजे दमा असलेल्या रूग्णांवर लक्ष देणं गरजेचं आहे. तसेच श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तुम्हाला ऑक्सिमीटरवर ऑक्सिजन तपासणं गरजेचं आहे.

*छातीत दुखणे-
कोरोनाचं सर्वात घातक लक्षण हे छातीत दुखणं मानलं जातं. तुमच्या जर छातीत त्रास होत असेल तर लगेच डॉक्टरांकडे जा.

*चव अन् वास न येणे-
चव न येणे आणि वास न येणे ही कोरोनाची असामान्य लक्षणे आहेत. ही लक्षणे ताप येण्याआधी दिसतात.

*घशात खवखव होणे-
कोरोना सर्दी, तापामुळे घशात खवखव जाणवते. तुम्हाला खोकला, ताप आणि घशात खवखव जाणवत असेल तर ही कोरोनाची लक्षणे आहेत.

* अशक्तपणा-
कोरोना रूग्णाला खोकला आणि ताप सोडून अशक्तपणा, थकवा जाणवतो. हे इतर व्हायरल इन्फेक्शनमुळेही होते. परंतू याकडे दुर्लक्ष करू नका.

*डायरिया-
कोरोनाच्या बहुतेक रूग्णांना डायरियाची लक्षणे दिसतात. यामुळे रूग्णांच्या पोटात गंभीर समस्या निर्माण होते. उल्टी होऊ लागते.

टीप- वाचकांनो या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. यातील कोणतंही लक्षण जाणवल्यास लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा. त्यांचा सल्ला घ्या.