फिटनेस आणि झटपट वजन कमी करण्यासाठी कीटो डायट प्लॅनचा उपयोग करतात. जाणून घ्या कीटो डायटचे इतर फायदे
मधुमेंहीसाठी गुणकारी
शरीरातील मॅटाबॉलिझमचा स्तर सुधारतो. ज्यामुळे शरीरातील जास्तीत जास्त फॅट्स बर्न होतात. त्यामुळे तुमच्या शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते. तसेच शरीरातील इन्सूलिनदेखील नियंत्रणात राहण्यास चांगली मदत होते. कर्बोदकांचे प्रमाण अतिशय कमी असल्याने ब्लड शुगर लेव्हल्समध्ये वाढ होत नाही.
वजन झटपट कमी होते, कॅलरीज लवकर बर्न होतात
या डायटमुळे शरीरामध्ये साठलेली अतिरिक्त चरबी घटण्यास मदत होते. या आहारामध्ये स्निग्ध पदार्थांचे सेवन अधिक असून, या स्निध पदार्थांचे चयापचय होत असताना कीटोन्स नामक कंपाउंड तयार होत असतात. शरीराला सक्रीय राहण्याकरिता जी उर्जा आवश्यक आहे ती या कीटोन्सकडून मिळत असते.
त्वचेचे आरोग्य सुधारते
किटो डाएटमुळे त्वचा उजळ आणि तजेलदार बनते. तसेच चेहऱ्यावरील पिंपल्सचीही समस्या कमी होते.
स्मरणशक्ती सुधारते
किटो डाएटमुळे स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते.
टीप – कोणताही डाएट प्लान स्वीकारण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे