देशात कोरोनाने थैमान घातले आहे. तर दुसरीकडे लसीकरण मोहिम जोरदार सुरू आहे. आता 18 वर्षांवरील व्यक्तींनाही कोरोना लस देण्यात येत आहे. लसीकरणासाठी नोंदणी कशी करायची, केंद्र कसं शोधायचं याची माहिती तुम्हाला देणार आहोत. तुमच्या मनातही हे प्रश्न आहेत का? मग हे वाचा.
*को-विन ॲपवरून लसीसाठी नोंदणी कशी करायची?
लसीसाठी नोंदणी करण्यासाठी पहिल्यांदा https://www.cowin.gov.in/home या वेबसाइटवर जाऊन तुम्ही तुमचा फोन नंबर रजिस्टर करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा तपशील भरून, नाव नोंदवावं लागेल. यानंतर तुम्ही तुमच्या जवळच्या लसीकरण केंद्रांमधील उपलब्ध स्लॉट्स तपासून तुमच्यासाठी एक वेळ बुक करू शकता.
*लसीकरण केंद्र कसे मिळते?
ॲपवर नोंदणी करताना लसीकरण केंद्रांची यादी दिसते. त्यातून तुम्ही घराजवळील केंद्र निवडू शकता. सध्या 18 ते 44 वयोगटासाठी सध्या केवळ सहाच केंद्र आहेत. त्यामुळे या गटातील नागरीकांना नोंदणी करताना, या सहा केंद्रांपैकी एका केंद्रांची निवड करता येणार आहे.
*तुमच्या फोनवरून दुसऱ्याचे नाव नोंदवता येईल का?
हो. तुम्हाला तुमच्या फोनवरून दुसऱ्याचं नाव नोंदवता येईल. एका मोबाईलवरून स्वत:सोबत इतर 3 लोकांची लसीकरणासाठी नोंदणी करता येऊ शकते.
* तुमच्याकडे ॲड्रॉईड मोबाईल किंवा इंटरनेट नाही, तर मग काय कराल?
सरकारी रुग्णालयात ऑन-साइट नोंदणी आहे. लोक थेट लसीकरण केंद्रावर जाऊन रजिस्ट्रेशन करू शकतात.
*पहिली लस घेतली पण, दुसरी राहिली तर?
तुम्ही लसीचा एक डोस घेतल्यानंतर डिजिटल प्रमाणपत्रात दिलेल्या वेळेनुसार दुसरा डोस घ्यावा लागेल. लस घेतल्यानंतर पुन्हा एक मेसेज पाठवला जाईल. परंतू दुसरा डोस घ्यावाच लागेल. दुसऱ्या डोससाठी मेसेज आला नाही तर ज्या तारखेला पहिला डोस घेतला ती तारीख लक्षात ठेवून केंद्रावर जावे.
* लस घेतल्यावर काय खबरदारी घ्यावी?
तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक लसीचे साइट इफेक्ट असतात. लस घेतल्यानंतर केंद्रावरच काही काळ थांबावे. काही त्रास जाणवला तर कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. अथवा डॉक्टरचा सल्ला घ्यावा.
*लस फुकट की पैसे देऊन?
सरकारी लसीकरण केंद्रांवर लस मोफत दिली जात आहे.
*कोरोनाविरोधी लस म्युटेट झालेल्या कोव्हिड-१९ वर प्रभावी आहे?
हो. नक्कीच प्रभावी आहे.
*लस घेतल्यानंतर संरक्षण किती दिवस मिळेल?
लस घेतल्यानंतर शरीरात तयार झालेली रोगप्रतिकारशक्ती किती दिवस टिकेल, हे अजूनही निर्धारित करण्यात आलेलं नाही. त्यामुळे लस घेतल्यानंतरही मास्क घालणं, हात धुणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन महत्त्वाचं आहे.