केळीची साल
केळीची साल हलक्या हाताने ५ मिनिट दातांवर घासा.

बेकिंग सोडा
एक चमचा बेकिंग सोड्यात थोडे पाणी किंवा लिंबाचा रस मिसळून या मिश्रणाने दात घासावेत. हा उपाय तुम्ही आठवड्यातून एकदा करू शकता.

तुळशीची पाने
तुळशीची पाने सावलीत वाळवून घ्या. या पानांची पावडर टूथपेस्टमध्ये मिसळून ब्रश करा.

लिंबाची साल
दातांवर लिंबाची साल चोळा आणि नंतर स्वच्छ धुवा. लिंबामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग एजंट असतात.

लिंबू आणि संत्र्याची साल
लिंबू आणि संत्र्याची साल वाळवून बारीक पावडर तयार करून त्या पावडरने दात घासावेत.

अननस
अननसाची फोड घेऊन दातांवर चोळा.

कडुनिंब
कडुनिंबाच्या पावडरने किंवा कडुनिंबाच्या काडीने ब्रश करावा.

स्ट्रॉबेरी
स्ट्रॉबेरी बारीक करुन त्यामध्ये बेकिंग सोडा मिसळा. बनलेले मिश्रण ब्रशने दातांवर घासा.

कठीण पदार्थ
ऊस, गाजर, काजू, बदाम, मनुके यांसारखे पदार्थ खावेत. त्यामुळे दातांमधील स्वच्छता होण्यास मदत होते.

मीठ आणि मोहरी तेल
मिठामध्ये मोहरीचे तेल दोन ते तीन थेंब टाकावेत. या मिश्रणाने दात घासावेत.

ऑलिव्ह ऑईल
कापसाच्या सहाय्याने दातांवर ऑलिव्ह ऑईलने मसाज करा.