व्हॅसलिन पेट्रोलियम जेलीचा वापर विशेष करून हिवाळ्यात जास्त केला जातो. ओठ उकलले असतील तर व्हॅसलिन पेट्रोलियम जेली लावली जाते. मात्र या व्यतिरिक्तही व्हॅसलिन पेट्रोलियम जेली अनेक कामांसाठी उपयोगी आहे. जाणून घ्या व्हॅसलिन पेट्रोलियम जेलीचे इतर उपयोग

नखे चमकदार आणि मऊ होतील
नखे जर खडबडीत, निस्तेज झाली असतील तर रात्री झोपताना नखांवर व्हॅसलिन पेट्रोलियम जेलीने मसाज करा. यामुळे नखे चमकदार आणि मऊ पण होतील.

कोपरांचा काळपटपणा घालवण्यासाठी
हाताचे कोपर काळे पडले असतील रोज रात्री झोपण्याआधी व्हॅसलिनने ५-१० मिनिट मसाज करा. हा उपाय नियमितपणे करावा.

केसांचे फाटे, रुक्षपणा कमी करण्यासाठी
केसांना फाटे फुटले असतील केस अधिक रुक्ष बनले असतील तर रात्री झोपताना किंवा केस धुण्यापूर्वी केसांच्या टोकांना आणि मुळांच्यावर व्हॅसलिन लावा. नंतर केस व्यवस्थित धुवा. व्हॅसलिन स्काल्पला लावू नका.

कपड्यांवरचे डाग काढण्यासाठी
कपड्यांवर पडलेले डाग काढण्यासाठी व्हॅसलिन उपयोगी आहे. डाग लागलेल्या भागावर व्हॅसलिन लावा आणि चोळा. मग पाण्याने स्वच्छ धुवा. डाग निघून जातात.

दरवाजा उघडझाप करताना आवाज येत असल्यास
दरवाजा उघडझाप करताना आवाज होत असल्यास दरवाज्याच्या कडांवर, बिजागरीत पेट्रोलियम जेली लावा.

फाटलेल्या टाचांवर गुणकारी
तळपायाच्या भेगांवर व्हॅसलिन लावल्यास फाटलेल्या टाचा मऊ होतील.
लिंबाचा रस आणि व्हॅसलिन मिक्स करून रोज रात्री झोपताना पायाच्या भेगांवर हलका मसाज केल्याने टाचांच्या भेगा कमी होतात.