रोगप्रतिकारक शक्ती ( Immunity Power) वाढविण्यासाठी सकस आहार घेण्याची गरज आहे. त्यासाठी आहारात फळांचा आणि पालेभाज्यांचा समावेश करणे गरजेचे आहे. ही फळे आणि भाज्या तुमची इम्युनिटी मजबूत करू शकतील. जाणून घ्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ कोणते`आहेत

*पालक
निरोगी राहण्यासाठी, आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी, गुणकारी असतात. यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 2, सी, ई, आयरन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, मॅगनीज, फॉस्फरस, सेलेनियम, कॉपर, प्रोटीन आणि फायबर यांसारखी पोषक तत्त्वे असतात. ही पोषक तत्त्वे इम्युनिटी वाढवण्यास मदत करतात. तुम्ही पालकचे सेवन करू शकता.

*ब्रोकली-
ब्रोकली ही अत्यंत स्वादिष्ट भाजी आहे. यात अनेक प्रकारची पोषकतत्त्वे असतात. यात फॉलिक अ‍ॅसिड कॅल्शियम, पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम यांचा समावेश आहे. ब्रोकलीचे विविध प्रकारे सेवन केले जाऊ शकते. तुम्ही सलाड, सूप किंवा कढी करून ब्रोकलीचा आहारात समावेश करू शकता. ब्रोकलीतील फायटोकोमिक्लस आणि अ‍ँटीऑक्सिडेंटमुळे विविध व्याधी आणि विषाणू संसर्गाशी लढण्यासाठी ताकद येते.

*मशरूम-
मशरुमचे बरेच औषधी गुण आहेत. मशरुम आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. यात अमिनो अ‍ॅसिड आणि व्हिटॅमिन डी यांसारखी पोषक तत्त्वे असतात. याची इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत होते.

*खोबरेल तेल-
भाजी बनवण्यासाठी विविध प्रकारच्या तेलाचा वापर केला जातो. तशाच प्रकारे जेवण बनवण्यासाठी खोबरेल तेलाचाही वापर केला जाऊ शकतो. या तेलामध्ये मिनरल्स असतात. याची आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी अर्थात आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी मोठी मदत होते.

*विविध पदार्थ
जिरे, कोथिंबीर आणि हळद या पदार्थांचा जेवणात समावेश करावा. तसेच वाळलेले आले आणि लसूण अन्नामध्ये समाविष्ट केले पाहिजे.

*आवळा
रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आवळा खाल्ला पाहिजे.

*हळदीचे दूध
रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हळदीचे दूध पिणे आवश्यक आहे.