एनर्जी टिकवून ठेण्यासाठी आणि थकवा घालवण्यासाठी उन्ह्याळ्यात द्रव्य पदार्थाचे अधिक प्रमाणात सेवन करावे.उन्ह्याळ्यात अती फास्टफूड खाणे आणि पोटभर जेवणे टाळावे. म्हणजे सुस्तपणा जाणवणार नाही. तसेच हेल्दी ड्रिंक्सचाही आहारात समावेश करावा. जाणून घ्या उन्ह्याळ्यात कोणते हेल्दी ड्रिंक्स प्यावेत आणि त्याचे इतर फायदे
गुलकंद मिल्कशेक :
गुलकंद मिल्कशेक पिल्याने शरीरातील उष्णता कमी होते. तसेच हिट स्ट्रोकची समस्याही जाणवत नाही. हे मिल्कशेक पिल्याने मुलांमध्ये तरतरी वाढेल. गुलकंद सिरप स्वरूपातही मिळतो. यात काही फळांचे कप टाकून तसेच सुका मेवा टाकून मुलांना पिल्यास आरोग्याला त्याचा फायदा होईल.
फळांची स्मूदी :
उन्ह्याळ्यात फळे खाणे खूप फायदेशीर आहे. फळांची स्मूदी, मोसंबी ज्युस, गुलाब दूध, पिच स्मूदी उन्हाळ्यात होणाऱ्या आजारापासून सुरक्षित करू शकतात.
लिंबू सरबत
उन्हाळ्याच्या दिवसात लिंबू सरबत पाणी आवर्जून प्यावे. लिंबू पाण्यात व्हिटॅमिन सी चे प्रमान भरपूर असते, जे थकलेल्या शरीराला रिफ्रेश करते. तसेच लिंबू पाण्यामुळे इम्युनिटीही वाढते. मात्र लिंबू सरबत पाण्यात बर्फाचा कमी वापर केला पाहिजे.अन्यथा सर्दी आणि घशाचा त्रास होऊ शकतो.
उसाचा रस
उसाच्या रसात असलेले अँटी ऑक्सिडेंट आणि फोटोप्रोटेक्टिव्ह तत्व शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवतात. त्यामुळे उन्हाळ्यात वायरल इन्फेकशनपासून आपले रक्षण होते आणि आजार दूर राहतात.
उन्हाळ्यात अनेकांना डिहाइड्रेशनचा त्रास होतो. ज्यामुळे जेवण पचण्यास अडचण येते. अशावेळी उसाच्या रसाचे सेवन केल्यास डिहाइड्रेशनचा त्रास दूर होतो. त्यामुळे उन्हाळ्यात उसाचा रस अवश्य प्यावा.
नारळपाणी
नारळपाणी शरीराला ऊर्जा पुरवते. दररोज नारळपाणी पिल्याने डी हायड्रेशनचा त्रासही कमी होतो. याशिवाय रोगप्रतिकारशक्तीही वाढते. त्यामुळे उन्हाळ्यात नारळपाणी देखील प्यावे.