गव्हापासून बनविला जाणारा रवा आरोग्यासाठी लाभदायक आहे. रव्यामध्ये कार्बोहायड्रेट, फायबर, चांगले चरबी, प्रथिने, जीवनसत्त्वे, व्हिटामिन ए, मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, सोडियम, जस्त यांसारखे पौष्टिक गुणधर्म असतात. जाणून घ्या रवा खाण्याचे फायदे

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी रवा उपयुक्त आहे. रव्यामध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असल्याने पचन होण्यास बराच वेळ लागतो आणि लवकर भूक देखील लागत नाही.

पचनशक्ती सुधारते
रव्याचे पदार्थ खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते.

अशक्तपणा, ऍनिमियावर गुणकारी
शरीरातील लोहाची कमतरता दूर होते. रव्यामध्ये रव्यात भरपूर लोह आढळते. अशक्तपणा, शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी रवा अवश्य खावा.

लवकर ऊर्जा मिळते
रव्यामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे रवा खाल्ल्याने शरीराला इन्स्टंट एनर्जी मिळते. नाश्त्यामध्ये रव्यापासून बनविलेल्या पदार्थ खाल्ल्याने दिवसभर एनर्जी राहते.

रक्तदाब नियंत्रित राहतो
रव्यामध्ये कोलेस्टेरॉल नसते. त्यामुळे यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.

डायबेटिज रुग्णांसाठी फायदेशीर
डायबेटिज असणाऱ्यांनी रवा खाल्ल्याने कोणतेही नुकसान होत नाही. कारण याचे ग्लायसेमिक निर्देशांक कमी असल्यामुळे शुगर वाढण्याचा धोका नसतो. रवा रक्तात शोषण्यात वेळ घेतो ज्याने शुगर लेवल कमी जास्त होण्याचा धोका नसतो.