वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
वजन कमी करण्यासाठी पाणीपुरी फायदेशीर आहे. मात्र त्यासाठी रव्याच्या पाणीपुरी खाण्याऐवजी गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या खा. तसेच जलजिरामध्ये गोडच्या ऐवजी पुदिना, लिंबू, हिंग आणि कच्च्या कैरीचा वापर करा.
तोंड येण्याच्या समस्येवर गुणकारी
वारंवार तोंड येत असेल तर पाणीपुरी खा. पाणीपुरीमधील तिखटपणा आणि पुदिन्याचा आंबटपणामुळे आलेले तोंड लवकर बरे होते.
पाणीपुरी खाल्ल्याने ॲसिडिटी दूर होते
पाणीपुरी खाल्ल्यावर मिळणाऱ्या फायद्यांमध्ये आणखी एक फायदा म्हणजे पाणीपुरीमध्ये जलजिरामध्ये पुदिना, कच्ची कैरी, काळे मीठ, काळी मिरी, वाटलेले जिरे आणि साधे मीठ टाकल्याने ॲसिडिटी दूर लवकर दूर होते. तसेच पचनक्रिया व्यवस्थित राहते. पाणीपुरीच्या पाण्यात पुदीना, जिरे आणि हिंगाचा वापर करून घरच्या घरी पाणीपुरीचे पाणी तयार केले, तर ते पचनास उपयुक्त ठरेल.
ऊर्जा मिळते
पाणीपुरी खाल्ल्याने शरीराला इन्स्टंट ऊर्जा मिळते. तसेच लगेच मूड ठीक होतो.
वेदना कमी करण्यास मदत करते
पाणीपुरीच्या पाण्यातील हिंग मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना कमी करण्यास मदत करते.
टीप : पाणीपुरी ही शक्यतो दुपारच्या वेळी खावी. यादरम्यान पाणीपुरी खाल्याने तुम्ही खाल्लेले अन्न हे चांगल्या प्रकारे पचते. पाणीपुरीत गोड पाण्याऐवजी शक्यतो आंबट किंवा पुदिनायुक्त पाणी वापरण्याचा प्रयत्न करा.