कोरफड(Aloevera) या वनस्पतीचा वापर अनेक औषधे, सौंदर्य प्रसाधने यांमध्ये होतो. कोरफड आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन-ए, सी, ई, अमीनो अ‍ॅसिड, व्हिटॅमिन बी-१२, फॉलिक अ‍ॅसिडचा स्त्रोत आहे. त्यामुळे कोरफडीचा ज्यूस (Aloevera juice) नियमित पिल्याने शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे होतात. जाणून घ्या एलोवेरा ज्यूस नियमित पिण्याचे फायदे –

पचनसंस्था व्यवस्थित राहते
एलोवेरा ज्यूस नियमित पिल्याने पोटाशी संबंधित समस्या कमी होतात. पचनक्रिया सुरळीत चालते. बद्धकोष्ठ, पाईल्सचा त्रास कमी होतो.

वजन कमी करण्यासाठी गुणकारी
कोरफडीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुण भरपूर प्रमाणात असतात आणि त्यामुळे वजन कमी करायला मदत होते. एलोवेरा ज्यूस शरीरात जमलेला मेद वेगाने जाळण्यास मदत करते. शरीरात मेद साठून राहत नाही.

सूज कमी होते, सांधेदुखीचा त्रास कमी होतो
कोरफडमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे एलोवेरा ज्यूस पिल्याने शरीरातील अंतर्गत अवयवांना आलेले सूज कमी होते. तसेच सांधेदुखीचा त्रास कमी होतो.

रोग प्रतिकार क्षमता वाढते
एलोवेरा ज्यूस नियमित सेवनाने रोग प्रतिकार क्षमता वाढते.

केसांच्या आरोग्यासाठी गुणकारी
एलोवेरा ज्यूस नियमित पिल्याने केस निरोगी आणि मजबूत होतात.

रक्तदाब नियंत्रणात राहतो
कॉलेस्ट्रॉलचं प्रमाण कोरफडीमुळे कमी होतं. कोरफडीचं नियमितपणे सेवन केलं तर त्यांच्या रक्तदाबाची समस्या कमी होते.

मधुमेह रुग्णांसाठी फायदेशीर
मधुमेही रुग्णांनी नियमितपणे कोरफडीच्या रसाचं सेवन केलं तर त्यांना रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यात मदत होते.

कोरडा खोकला कमी होतो
एलोवेरा ज्यूसमध्ये मध मिसळून पिल्याने कोरडा खोकला कमी होतो.

हिरड्यांना आलेली सूज कमी होते
कोरफडीचा रस प्यायल्यास हिरड्यांना आलेली सूज कमी होते.

टीप – एकावेळी ३० मिली इतक्याच प्रमाणात एलोवेरा ज्यूसचं सेवन करावं. अतिप्रमाणात एलोवेरा ज्यूस पिऊ नये.

उन्हाळ्यात तांदुळजाची भाजी आवश्य खावी; उष्णतेसह युरीन इनफेक्शनच्या समस्यांवरही गुणकारी; जाणून घ्या इतर उपयोग

मसाल्यातील पदार्थ ‘कंकोळ’ पोटदुखीसह अनके आजारांवर गुणकारी; जाणून घ्या महत्वाचे उपयोग