हळदीचे दूध पिण्याचे फायदे अनेकांना माहित असतील. त्याचप्रमाणे हळदीचे पाणी पिण्याचेही अनेक फायदे आहेत. हळदीचे दूध विशेषकरून रात्री झोपताना पितात तर, हळदीचे पाणी सकाळी उठल्यावर पितात. जाणून घ्या सकाळी रिकाम्या पोटी हळदीचे पाणी पिण्याचे फायदे

पोटाच्या समस्यांवर गुणकारी
हळदीचे पाणी पिल्याने पोटाच्या समस्या कमी होतात. जेवण लवकर पचते. हळदीचे पाणी पिल्याने पित्ताशयामध्ये पित्तरस निर्माण होण्यास मदत होते. पित्तरसामुळे पचनशक्ती चांगली होते. यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते.

सांधे दुखी आणि सूज दूर करण्यासाठी फायदेशीर
हळदीमध्ये असणारे करक्‍युमिन रसाययन सूज कमी करण्यासाठी प्रभावी आहे. हळदीचे पाणी पिल्याने शरीराच्या अंतर्गत किंवा बाह्य भागावर आलेली सूज कमी होते. हे पाणी सांधे दुखी आणि सूज दूर करण्यासाठी फायदेशीर असते.

त्वचा सुंदर आणि निरोगी बनते
हळदीचे पाणी पिल्याने त्वचेमधील विषारी घटक बाहेर निघण्यास मदत होते. हळदीमध्ये रक्त स्वच्छ करणारे घटक असतात. यामुळे त्वचा नितळ आणि सुंदर बनते.

यकृताचे आरोग्य सुधारते
हळदीचे पाणी विषारी गोष्टींपासून यकृताचे रक्षण करते आणि खराब यकृताच्या पेशी पुन्हा नीट होण्यास मदत होते.

रक्त शुद्ध राहते
हळदीचे पाणी पिल्याने रक्त गोठत नाही आणि रक्त साफ होण्यासही मदत होते. त्याशिवाय रक्ताच्या धमन्यांमध्येही रक्त साठत नाही.

कॅन्सरसारखे आजार दूर राहतात
हळदीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सीडेंट तत्व असतात. त्यामुळे कॅन्सरसारखे आजार दूर राहतात.

हळदीचे पाणी कसे बनवावे
कोमट पाण्यामध्ये हळद चांगल्या प्रकारे मिक्स करा.
तुमच्या आवडीनुसार तुम्ही हळदीच्या पाण्यात लिंबाचा रसही मिसळू शकता.

 

रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

उन्हाळ्यात हात, पायांना अधिक घाम येत असेल तर ‘हे’ घरगुती उपाय करून पहा