शेतात सहजपणे उगवणारी आणि बाराही महिने मिळणारी तांदुळजाची भाजी उपयुक्त आहे. मात्र त्याबद्दल पुरेशी माहिती नसल्याने तांदुळजाची भाजी खाण्याकडे दुर्लक्ष केले जाते. जाणून घ्या तांदुळजाची भाजी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे –
शरीरातील उष्णता कमी होते
तांदुळजाची भाजी खाल्याने शरीरामध्ये वाढलेली उष्णता कमी होते. त्यामुळे तांदुळजाची भाजी उन्हाळ्यात तर अवश्य खावी.
डोळे, केस, त्वचेसाठी गुणकारी
तांदुळजाची भाजीमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी अधिक प्रमाणात आढळते. त्यामुळे डोळे, केस आणि त्वचेचे आरोग्य सुधारते.
युरीन इन्फेक्शन होत नाही
तांदुळजाची भाजीचे सेवन केल्याने युरीन इन्फेक्शन होत नाही. तसेच मूत्रविकाराशी संबंधित समस्या कमी होतात.
अनेक आजारांवर गुणकारी
मुळव्याध, मधुमेह, बद्धकोष्ठता, पोटाचे आजार यांसारख्या आजारांवर तांदुळजाची भाजी गुणकारी आहे.
जखम लवकर बरी होते
जखमेवर तांदुळजा भाजीचा लेप लावल्याने जखम लवकर बरी होते तसेच चिघळत नाही.