डोकेदुखीला अनेक गोष्टी कारणीभूत असतात. डोकेदुखीची ही कारणे जाणून घेऊन घरगुती उपाय केले तर त्याचा निश्चितच फायदा होईल. जाणून घ्या डोकेदुखीची कारणे व घरगुती उपाय –

उष्णता

उष्णता , गरमी किंवा उन्हामुळे जर डोकं दुखत असेल तर चंदन पावडरची पेस्ट तयार करून कपाळावर लावा.

नेहमीच डोके दुखणे

i ) डोकेदुखीचा त्रास नेहमीचाच असलं तर सफरचंदावर मीठ लावून खात जा व त्यांनतर कोमट पाण्याचे सेवन करा. हा प्रयोग सलग आठ ते दहा दिवस करून पहा.
ii ) रोज एक ग्लास गायीच्या दुधाचे सेवन करा.

 नसा आणि स्नायूंवर ताण पडल्याने

पाठीच्या वरचा भाग , खांदा किंवा मानेवरच्या नसा आणि स्नायूंवर ताण पडल्याने अनेकदा डोकेदुखीची समस्या निर्माण होते. अशा प्रकारची डोकेदुखी सुरु झाल्यास मानेचे व खांद्याचे स्ट्रेचिंग करा. मान डावीकडे-उजवीकडे, वर-खाली सावकाशपणे फिरवा.

ॲसिडीटी

ॲसिडीटी किंवा गॅसमुळे जर डोके दुखत असलं तर एक ग्लास गरम पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्या. तात्काळ आराम मिळेल.

डिहायड्रेशन

i ) शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले की डिहायड्रेशन होते. त्यामुळेही डोके दुखू शकते. त्यामुळे अचानक डोके दुखू लागल्यास भरपूर पाणी प्या.
ii ) डिहायड्रेशनपासून होणाऱ्या डोकेदुखीपासून मुक्तता मिळवण्यासाठी टरबुजसारख्या पाणीदार फळांचा आहारात समावेश करावा.

शरीरातील आम्लांचं प्रमाण कमी अधीक झाल्याने

शरीरातील आम्लांचं प्रमाण कमी अधीक झाल्याने देखील डोकेदुखीची समस्या निर्माण होते. अशावेळी लिंबूपाण्यात थोडं मीठ किंवा खाण्याचा सोडा घालून ते प्या.

नसांना सूज आल्याने

अनेकदा डोक्यामधील नसांना सूज असल्यामुळेही डोकेदुखीची समस्या निर्माण होते. अशावेळी कपाळ आणि कानाच्या जवळच्या भागावर बर्फाचा शेक द्या. मात्र शक्यतो थंडीत हा उपाय करणे टाळावे.

ऑक्सिजनची कमतरता

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळेही डोके दुखू शकते. अशावेळी भरपूर झाड असलेल्या ठिकाणी फेरफटका मारावा. तसेच श्वसनाचे व्यायाम देखील करावेत.

सर्दी 

i ) सर्दीमुळे डोके दुखत असलं तर धनेपूड आणि साखर एकत्र करून खा.
ii ) तसेच आलेयुक्त चहा घ्या. यामुळे डोकेदुखी राहतेच शिवाय सर्दीमुळे घसा आणि अंग दुखत असेल तर त्यावरही अराम मिळतो. कारण आलेयुक्त चहा शरीरामधील रक्तवाहिन्यांतील सूज कमी करण्यास मदत करतो.