कोरोनाशी लढा देण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मजबूत प्रतिकारशक्ती असल्यास संसर्ग रोखण्यास मदत होईल. त्यातच आता आयुष मंत्रालयाने कोविड -19 संसर्गापासून बचाव करण्यासाठी आहारात काही गोष्टींचा समावेश केल्यास रोग प्रतिकारशक्ती वाढेल, अशी माहिती दिली आहे.
आयुष मंत्रालयाने घरगुती अन्न खाण्यास सांगितले आहे. जिरे, कोथिंबीर आणि हळद या पदार्थांचा जेवणात समावेश करावा. वाळलेले आले आणि लसूण अन्नामध्ये समाविष्ट केले पाहिजे. रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आवळा खाल्ला पाहिजे.
रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी, 20 ग्रॅम च्यवनप्राश दिवसातून दोनदा रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत घ्यावे. तसेच हळदीचे दूध पिणे आवश्यक आहे.
हर्बल चहा किंवा 150 मि.ली. पाण्यात तुळस, दालचिनी, सुकलेले आले आणि मिरपूड यापासून बनवलेला हर्बल चहा किंवा काढा प्यायल्यास रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते.
साधे पाणी किंवा पुदिना किंवा ओव्याच्या पाण्यासोबत स्टीम थेरपी देखील रोग प्रतिकारशक्ती निर्माण करण्याचा एक चांगला मार्ग आहे
तुम्ही दिवसातून एक किंवा दोनदा ऑईल पुलिंग थेरपी करू शकता. एक चमचा नारळ किंवा तिळाचे तेल तोंडात घ्या आणि ते 2-3 मिनिटे फिरवा आणि नंतर थुंकून टाका. कोमट पाण्याने गुळण्या करा.