उन्हाळ्यात उष्णतेमुळे अधिक प्रमाणात घाम येतो. यामध्ये विशेषतः हात, पायाला काहींना जरा जास्तच प्रमाणात घाम येतो. उष्णता, हार्मोनल बदल, चुकीचा आहार, भीती-दडपण यांसारख्या अनेक कारणांनी हात-पायाला काहींना अधिक प्रमाणात घाम येतो. हात-पायाला अधिक प्रमाणात घाम येऊ नये म्हणून काही घरगुती उपाय करता येऊ शकतात.गुलाब पाणी
गुलाब पाणी तळहात आणि तळपायांना लावावे. यामुळे त्वचेची दुर्गंधी जाते तसेच त्वचा तजेलदार होण्यास मदत होते.हात-पाय थंड पाण्यात बुडवून ठेवा
पायांना अति घाम येत असेल तर १५ मिनिटे हात-पाय थंड पाण्यात बुडवून ठेवा. यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते.अॅपल सायडर व्हिनेगर
अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये पाणी मिसळून ते हात, पायाला लावा.टोमॅटो
नियमित टोमॅटोचा रस प्यायल्याने हात आणि पायाला अनावश्यक घाम येणे कमी होईल.बेकिंग सोडा
बेकिंग सोड्यामध्ये थोडेसे पाणी घालून पेस्ट बनवून हात आणि पायाला लावा. ५ मिनिटांनंतर स्वच्छ करा.कच्चा बटाटा
कच्चा बटाटा कापून घ्या आणि तळहात आणि तळपायांना लावून घ्या. १० मिनिटानंतर धुवून टाका.संत्र्याची साल
संत्र्याची साल उन्हामध्ये वाळवून त्याची पावडर तयार करा. ही पावडर नियमितपणे आपल्या हातांना आणि पायांना लावा.