आपल्या स्वयंपाक घरातील लसूण अनेक प्रकारच्या समस्या दूर करतो. लसूण खाल्ल्याने प्रतिकारशक्तीही वाढते.
जाणून घ्या लसणाचे आरोग्यदायी फायदे
जर तुमच्या घशात खवखव होत असेल तर एक ग्लास गरम पाणी घ्या. त्यात लसणाच्या रसाचे काही थेंब मिसळा. या पाण्याने गुळण्या करा, तुम्हाला आराम मिळेल.
तुम्हाला जर दम्याचा विकार असेल तर लसूण खूपच फायदेशीर आहे. दमा असेल तर तुम्ही लसूणचा रस वापरा. तसेच तुम्ही लसूणही खाऊ शकता.
आपल्याला जर मुरुमांचा त्रास असेल तर लसणाचा रस वापरा. त्यासाठी आधी 5 ते 6 चमचे लसणाचा रस घ्या आणि कापसाच्या साहाय्याने चेहऱ्यावर लावा. थोडा वेळ त्याला सुकू द्या. मग नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.
याशिवाय तुमचे केस गळत असतील तर तुम्ही लसणाचा रस वापरू शकता. तसेच केसात कोंड्याची समस्या असेल तर लसणाच रस वापरू शकता. आधी 2 चमचे लसूण रस घ्या, त्यात मोहरीच्या तेलाचे काही थेंब घाला आणि आपल्या केसांच्या मुळांवर लावा.