फेस सीरम कसे वापरावे
सीरम वापरण्यापूर्वी त्याची पॅच टेस्ट अवश्य करा.
सीरम लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. फेस सीरम त्वचेवर टोनर लावल्यानंतर लावावे. सीरम चेहऱ्याला लावताना फक्त दोनच बोटांचा वापर करावा, ज्यामुळे सिरम वाया जाणार नाही.
सीरम बोटाना रगडून हलक्या हाताने चेहऱ्यावर लावा. त्यानंतर चेहऱ्याला मॉईस्चराईजर लावा.चेहऱ्याला ग्लो येण्यासाठी आणि त्वचा निरोगी बनण्यासाठी तुम्हाला सीरमचा नियमित वापर करावा लागेल.



फेस सीरम वापरण्याचे फायदे
फेस सीरम हे पातळ आणि हलकं असल्याने त्वचेत लगेच मुरते. सीरम त्वचेला हायड्रेट करण्यासाठी मदत करते. त्यामुळे चेहऱ्यावर ग्लो दिसू लागतो.
सीरम हे एक अँटी एजिंग मेकअप प्रॉडक्ट आहे. यामुळे त्वचेचा सैलपणा आणि सुरकुत्या कमी होतात.