बदललेले वातावरण, जीवनशैली, ताणतणाव, प्रदूषण, सौंदर्य प्रसाधनांचा अतिवापर यांसारख्या अनेक कारणांनी केस गळतीची, अकाली टक्कल पडण्याची समस्या वाढली आहे. मात्र आपला आहार चांगला असेल तर, केस गळतीची समस्या रोखता येऊ शकते. जाणून घ्या केस गळती रोखण्यासाठी कोणते पदार्थ खावेत –

गाजर
गाजरामध्ये व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरोटीन मुबलक प्रमाणामध्ये असते. गाजराच्या सेवनाने केसांची वाढ होण्यास मदत होते. शारीरिक स्वास्थ्य सुधारते. तसेच केस पांढरे होण्याची प्रक्रिया मंदावते. केस गळती कमी होऊन केस मजबूत आणि चमकदार बनतात.

अंडी
अंड्यांमध्ये व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी-6, ओमेगा-3, कॅल्शियम आणि झिंक भरपूर प्रमाणात असतात. हे घटक केस गळतीस प्रतिबंध करतात.

 

ड्राय फ्रुट्स
ड्राय फ्रुट्सच्या सेवनाने रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते. शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी योग्य असल्यास केस गळती कमी होऊन केसांची वाढही चांगली होते.

 

कडधान्ये
ज्यांना केस गळतीची समस्या आहे, ज्यांचे केस विरळ आहेत अशा लोकांनी मोड आलेली कडधान्ये खावीत. त्यामुळे केस वाढतात. तसेच केसांच्या अनेक समस्या दूर होतात. कडधान्यांमध्ये सिलिका हा पोषक घटक असतो. सिलिका जीवनसत्त्वे आणि खनिजे शोषण्यास मदत करतात. त्यामुळे केसगळती कमी होते.

दही
नियमित दही खाल्ल्याने केसांचे पोषण होऊन ते मजबूत होतात तसेच केस गळतीही कमी होते तुम्ही दही केसांनाही लावू शकता.