कोको बीन्स पासून तयार होणाऱ्या कोको बटरचा वापर क्रीम, लिपबाम, चोकलेट आणि बॉडीलोशनमध्ये केला जातो. त्याचप्रमाणे कोको बटरचे इतरही अनेक फायदे आहेत जाणून घ्या –
त्वचेचे संरक्षण करते, त्वचा निरोगी बनवते
कोको बटर त्वचेला मॉईश्चरायझ करते तसेच त्वचेचे सूर्यकिरणांपासून संरक्षण करते. कोको बटरमध्ये असणाऱ्या अँटी ऑक्सिडेन्ट गुणधर्मामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात तसेच त्वचा तजेलदार दिसते.
स्ट्रेच मार्क्स कमी होतात
कोको बटरमुळे त्वचेवरील काळे डाग, स्ट्रेच मार्क्स कमी होण्यास मदत होते.
इम्युनिटी पावर वाढते
कोको बटरमध्ये व्हिटॅमिन, अँटी ऑक्सिडेन्ट असल्याने इम्युनिटी पावर वाढण्यास मदत होते.
वजन वाढण्यास मदत करते
कोको बटरमध्ये फॅट्स मोठ्या प्रमाणात असल्याने कोको बटरमुळे वजन वाढण्यास मदत होते.