होळी खेळताना पूर्ण बाह्यांचे कपडे घाला म्हणजे हातांना अधिक रंग लागणार नाही.
रंग खेळण्यापूर्वी आणि रंग खेळल्यानंतर चेहऱ्याला बर्फाने मसाज करा. एका कापडामध्ये बर्फ घेऊन चेहऱ्यला बर्फ लावा. यामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये रंग राहणार नाही.
केसांना खोबरेल तेल किंवा मोहरीचे तेल लावा. त्यामुळे केस कोरडेही पडणार नाहीत आणि रंगांपासून त्यांचे संरक्षण होईल. केसांमधील रंग काढताना जास्त गरम पाण्याचा वापर करू नका.
होळी खेळण्याआधी चेहऱ्याला मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन क्रीम लावा. यामुळे तुमची त्वचेवर रंगांचा जास्त परिणाम होणार नाही. तसेच त्वचा मॉइश्चराइज्ड राहील.
त्वचेवर पेट्रोलियम जेल लावा. त्यामुळे रंग त्वचेच्या आत जाणार नाहीत.
त्वचेवरील रंग साफ करताना त्वचा घासू नका, तसेच साबणाऐवजी शक्यतो फेसवॉशचा वापर करा.
बेसन आणि दूध एकत्र करून त्याची पेस्ट रंग असलेल्या त्वचेवर ही पेस्ट लावा. सुकल्यानंतर त्वचा स्वच्छ पाण्याने धुवून काढा.
चेहरा स्वच्छ केल्यानंतर चेहऱ्याला मुलतानी मातीचा फेस पॅक लावा. यामुळे त्वचेच्या छिद्रांमधीलही रंग निघून जातील.
होळीचा रंग काढताना या गोष्टी करणे टाळा
रंग काढताना त्वचेला जोरजोरात चेहरा घासणे टाळा. रंग काढण्यासाठी रॉकेल, केमिकल, डिटर्जेंट अथवा कपडे धुण्याचा साबण यांचा वापर करू नका.