हिरव्या पालेभाज्या खाणे आरोग्यासाठी नेहमीच चांगले असते. मात्र त्या ताज्या आणि सिजनल असाव्यात. आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असणारी मेथी ही एक महत्वपूर्ण भाजी आहे. काही लोकांना मेथी अजिबात आवडत नाही तर काहींना मेथी प्रचंड प्रमाणात आवडते आणि काही लोक असे असतात जे अन्नाला पूर्ण ब्रम्ह मानतात आणि नेहमीच आहार संतुलित ठेवतात. उत्तम आरोग्यासाठी मेथी अवश्य खावी मात्र तिचा अतिरेक नको. विशेष करून उन्हाळ्यात मेथी कमी प्रमाणात खावी.
उन्हाळ्यात मेथी अधिक प्रमाणात खाल्ल्याने होणारे त्रास
मेथीमध्ये शरीरातील उष्णता वाढवणारे घटक असतात, म्हणून उन्हाळ्यात मेथी कमी प्रमाणात खावी. शरीरात उष्णता वाढल्याने तोंड येणे, पाईल्स, यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हिवाळ्यात मेथीचे सेवन करणे लाभदायक आहे. कारण शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी, बॉडी टेम्परेचर स्थिर ठेवण्यासाठी मेथी उपयुक्त आहे.
मेथी उष्ण गुणधर्माची असते, म्हणूनच मेथी खाल्ल्यामुळे काही लोकांना ब्लिडींगचा त्रास सुद्धा होऊ शकतो.
मेथी जास्त खाल्ल्यामुळे अतिसाराचा त्रास होतो.
मेथीमुळे शरीरातील उष्णता वाढत असल्याने गर्भवती स्त्रियांना मेथीचे अतिप्रमाणात सेवन करू नये. तसेच मेथी बीज जास्त खाल्ल्यास आंतरिक रक्तस्त्राव होऊ शकतो.
टीप – वरील लेख हा माहितीसाठी दिलेला आहे. प्रत्येकाची शरीररचना आणि पचविण्याची ताकत वेगळी असते. वरील माहिती प्रत्येकालाच लागू होईल असे नाही.
उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी खा अंजीर; जाणून घ्या इतरही फायदे
मेकअप प्रॉडक्टसने नाही तर, घरगुती उपायांनी वाढवा आयब्रोचे सौंदर्य