भय, चिंता, काळजी, नैराश्य, क्रोध या विकारांपासून मुक्तता मिळविण्यासाठी आणि मनःशांतीसाठी ‘भ्रामरी प्राणायाम’ उपयुक्त आहे. या प्राणायामात श्वास बाहेर सोडताना भुंग्याच्या गुणगुणण्यासारखा आवाज येतो, त्यामुळे या प्रकाराला भ्रामरी प्राणायाम नाव देण्यात आले आहे.
भ्रामरी प्राणायाम कसे करावे
- मांडी घालून बसा किंवा पद्मासनात बसा. मन शांत करा. कोणताही विचार करू नका.
- सामान्य गतीस श्वास घ्या.
- नंतर अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करावे आणि बाकी बोटांनी डोळ्यांना झाकून डोळे बंद करावेत.
- आता मोठा श्वास घ्या आणि हळूहळू श्वास सोडताना ‘म’ चा स्वर काढत भुंग्यासारखं गुणगुणण्याची क्रिया करावी.
आवाज मेंदूत गुंजत राहील अशा प्रकारे मन एकाग्र करा. - सुरुवातीला हे प्राणायाम ७ वेळा करा नंतर तुमच्या क्षमतेनुसार १०-१५ मिनिट करू शकता.
भ्रामरी प्राणायाम करण्याचे फायदे
- या प्राणायामाच्या नियमित सरावाने मन आणि मेंदू शांत राहतो.
- मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते.
- भय, चिंता, काळजी, नैराश्य आणि क्रोध या विकारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
- आवाज सुंदर, मधुर आणि नाजूक बनतो.
- पचनकार्य क्षमतेत वाढ होते.
- रक्ताभिसरण प्रकिया सुरळीत राहते.
टीप : कानदुखीचे विकार असणाऱ्यांनी वैद्यकीय सल्ल्याने हे प्राणायाम करावे.
बडीशेपकडे फक्त माऊथ फ्रेशनर म्हणून पाहू नका; ‘या’ समस्यांवर आहे अत्यंत गुणकारी
सरकारच्या ‘ई-संजीवनी’वर मिळणार आता मोफत आयुर्वेदिक सल्ला; काय आहे ही सुविधा? जाणून घ्या