आजकल अनेकांना आयब्रोचे केस गळण्याची समस्या सतावत आहे. ब्युटी प्रॉडक्टचा वापर करून तात्पुरत्या स्वरूपात कृत्रिमरीत्या आयब्रो दाट आणि काळ्या बनवता येतात. मात्र ब्युटी प्रॉडक्टच्या अतिवापराने आयब्रो अधिकच विरळ होऊ शकतात आणि नेहमीच मेकअप करणे शक्य देखील नाही. त्यामुळे या समस्येवर वेळीच उपाय करणे आवश्यक आहे. आयब्रोचे केस काळे आणि दाट करण्यासाठी काही घरगुती उपाय केले तर ही आयब्रोचे केस गळण्याची समस्या नक्कीच कमी होईल. जाणून घ्या आयब्रोचे केस काळे आणि दाट करण्यासाठी घरगुती उपाय

कांद्याचा रस
केसांची वाढ होण्यासाठी कांद्याचा रस खूपच फायदेशीर आहे. त्यामुळे आयब्रोच्या वाढीसाठीही कांद्याचा रस लावू शकता. मात्र कांद्याचा रस आयब्रोला लावताना डोळ्यात जाणार नाही याची खबरदारी घ्या. कारण कांद्याचा रस डोळ्यात गेल्याने डोळ्यांची आग, जळजळ होऊ शकते.

खोबरेल तेल
आयब्रो काळ्याशार आणि दाट करण्यासाठी खोबरेल तेल घेऊन आयब्रोला लावा. नंतर थोडा मसाज करा. त्यामुळे नक्की फरक जाणवेल.

कोरफड जेल
दिवसातून दोन वेळा कोरफड जेल आयब्रोला लावा. थोडासा मसाज करा. यामुळे नक्की आयब्रो दाट आणि काळ्याशार होतील.

कच्चे दूध
कच्चे दूध कापसाच्या मदतीने दूध आयब्रोला लावा. यामुळे आयब्रो काळे आणि दाट होतील शिवाय त्यांना चमकही येईल.

मेथी दाणे
रात्रभर मेथीचे दाणे पाण्यात भिजवून सकाळी मेथीदाण्याची पेस्ट करा. ही मेथीची पेस्ट आयब्रोवर लावा. १०-१५ मिनिटांनी स्वच्छ धुवून टाका.

बदाम तेल
रात्री झोपताना बदाम तेलाने आयब्रोची मालिश करा.

आरोग्यासाठी बहुगुणी आहे अडुळसा; डोकेदुखीसह अनेक आजारांना करतो दूर

व्यायामाशिवाय कमी करा वजन, ‘या’ आहेत सोप्या ट्रिक्स