अनेकांना सकाळी उठल्यानंतर थकवा (fatigue) जाणवतो. तसेच काही काम केल्यावर लगेच थकवा येतो. थकवा का येतो त्याचं कारण म्हणजे शरीराला पोषक तत्वे कमी पडतात. थकवा जाणवल्याने अनेक आजार उद्भवतात. थकवा अशक्तपणा, थायरॉईड, मधुमेह, फुफ्फुस आणि हृदयविकारामुळे देखील येऊ शकतो. त्यामुळे यावर उपाय करणे गरजेचे आहे. सुस्तपणा, थकवा जाणवत असेल तर हे उपाय करून पहाच
केळी खा
थकवा वा अशक्तपणा जाणवत असेल तर आपल्या आहारात केळीचा सामावेश करा. रोज केळी खा. त्यामुळे शरीरातील सुस्ती, थकवा दूर होण्यास मदत होते.
डाळिंब खा
रोज डाळिंब खा. डाळिंब खाल्ल्याने आपल्या शरीरातील रक्त वाढते, अशक्तपणा जातो. तसेच थकवाही दूर होतो. अधिक प्रमाणात थकवा जाणवत असेल तर, डाळिंबाच्या दाण्यांमध्ये थोडी साखर आणि मीठ मिक्स करून खा.
सफरचंद
रोज सकाळी एक सफरचंद खावे. सफरचंदामुळे शरीराला ऊर्जा मिळतेच शिवाय रक्त वाढीसाठी मदत होते. थकवा जर अधिक प्रमाणात जाणवत असल तर, दुपारी सफरचंदाला थोडे मीठ लावून खावे.
तूप खा
देशी तूप खाण्याचे खूप फायदे आहेत. त्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते. तसेच वजन कमी करण्यासही देशी तूपाचा फायदा होतो. शिवाय आपल्या शरीरातील अशक्तपणा आणि थकवा दूर करण्यासाठी देशी तूपाचा उपयोग होतो.
तुळशीची पाने
तुळशीची पाने खाल्ल्याने आपले शरीर अनेक आजारांपासून दूर राहते. तसेच थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यासही तुळशीची पाने रोज खाल्ली पाहिजेत. कारण यात अनेक औषधी गुणधर्म असतात. तसेच यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते.
काळवंडलेली मान उजळण्यासाठी 5 घरगुती उपाय
उन्हाळ्यात मुलांना हे पाच ‘हेल्दी ड्रिंक्स’ पाजून ठेवा एकदम फ्रेश; आजारापासून ही राहतील दूर