मासिक पाळी (periods) ही अजूनही समाजाने मोकळ्या मानाने स्वीकारलेली गोष्ट नाही. त्यामुळे या दिवसात स्त्रियांना शारीरिक त्रासासोबतच मानसिक कुचंबणाही सहन करावी लागते. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य या दोन्हींही गोष्टी स्त्रिच्या आरोग्यासाठी महत्वाच्या आहेत. म्हणून मासिक पाळी आली असताना स्त्रियांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. जाणून घ्या मासिक पाळी काय काळजी घ्यावी तसेच जागरूकता राखावी.

  • अति कष्टाची कामे करणे टाळावे.
  • पुरेशी विश्रांती घ्यावी. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा.
  • योग्य आणि आहार हलका घ्यावा. तेलकट तळलेले, मसाल्याचे चमचमीत पदार्थ खाऊ नयेत. जास्तीत जास्त पाणी प्या.
  • शरीराला झेपेल एवढा व्यायाम करा.
  • या दिवसांमध्ये अधिक त्रास होत असेल तर, कोमट पाणी प्या. कोमट पाणी पिल्याने पोटदुखी कमी होण्यास मदत होते.
  • पाळीमध्ये इनफेक्शन होऊ नये म्हणून स्वच्छता राखावी. कापडा ऐवजी सॅनिटरी पॅड वापरावे.
    एक पॅड जास्त वेळेकरिता वापरु नये. त्यामुळे त्वचेला रॅशेस येतात. दिवसातून दोन ते चार वेळा पॅड बदलावे.
  • पोट दुखत असेल तर गरम पाण्याच्या बॅगने शेकवावे.
  • योनीमार्ग स्वच्छ करण्यासाठी सुगंधित, केमिकलयुक्त लिक्विड वापरणे टाळावे.
  • सर्वात महत्वाचे म्हणजे सामाजिक आणि नैसर्गिक बांधिलकी जप्त वापरलेल्या पॅडची योग्य विल्हेवाट लावावी.