पोटाच्या समस्या आपल्याला त्रस्त करून सोडतात. ऍसिडिटी अशीच एक समस्या आहे ज्यामुळे प्रत्येक जण हैराण असतो. शरीरात अधिक प्रमाणात पित्त निर्माण झाल्यास ऍसिडिटीचा नकोस असलेला त्रास जाणतो. वेळेत न जेवणे, पॅकेजिंग पदार्थांचे अति सेवन ऍसिडिटीला कारणीभूत ठरते.अशावेळी काही गुणकारी पेय पिल्यास ऍसिडिटीतून पटकन सुटकारा मिळतो. कोणते आहेत हे पेय जे तुम्हाला सहज उपलब्ध होतील आपण पाहुयात.
1. नारळ पाणी :
ऍसिडिटी आणि पोटाच्या अन्य असमस्यांवर नारळ पाणी अत्यंत गुणकारी उपाय ठरतो. नारळ पाण्याने आपली अपचनाचा समस्या दूर होते. यात फायबरचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे आपली पचनशक्ती सुधारते. तसेच याने पित्त नियंत्रणात राहण्यास मदत होते. रोज नारळ पाणी पिणे आरोग्यास फायदेशीर ठरते.
2. पुदिन्याचा ज्युस :
पुदिना ऍसिडिटी अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो. पुदिन्यामुळे पचनशक्ती सुधारते. त्यामुळे पुदिना पाण्यात टाकून तसेच चहामध्ये टाकून पिल्यास त्याचा भरपूर फायदा होतो. ऍसिडिटी कमी करण्यासाठी पुदिन्याची पाने पाण्यात उकळून त्याचे पाणी पिल्याने भरपूर फायदा होतो.
3. जिऱ्याचे पाणी :
आयुर्वेदानुसार जिरे पचनासाठी अत्यंत प्रभावी आहे. हे औषधी जिरे पाचक रस नियंत्रणात ठेवतात. त्यामुळे ऍसिडिटी आणि अपचनाचा समस्येपासून तुमचा फायदा होतो. जिऱ्याचे पाणी पिल्याने ऍसिडिटी दूर होण्यास मदत होते.
4. ताक :
ऍसिड रिफ्लेक्स आणि हार्टबर्नच्या समस्येपासून मुक्तता मिळण्यासाठी ताक पिणे अत्यंत फायदेशीर ठरते. यात लॅक्टिक ऍसिड भरपूर असते जे ऍसिडिटी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. रोज एक ग्लास ताक पिल्याने ऍसिडिटीची समस्या दूर राहण्यास मदत मिळेल. ताक पोट थंड ठेवल्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.