उकाडा सुरू झाला की आपल्याला आपल्या लाईफस्टाईलमध्ये आणि आहारात बदल करावा लागतो. उन्हाळ्यात आपण थंड पेय अधिक सेवन करतो. सहसा कोंड्रिंक्स सोडा पाण्यावर आपला भर असतो. परंतु ही पेय आपल्या शरीरासाठी अपायकारक असतात. त्यापेक्षा शरीराला आरोग्यदायी ठरेल अशा पेयचे सेवन करावे. जसेकी उसाचा रस. उन्हाळ्याच्या दिवसात उसाचा रस आपल्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी ठरतो.
उसाचा रस कॅल्शिअम, पोटॅशिअम, लोह, फॉस्फरस याचा समृद्ध स्रोत आहे. त्यामुळे या रसाला आरोग्यास फायदेशीर रस म्हणतात. हा रस पिल्याने आपल्याला कोणते कोणते फायदे होतात हे आपण समजून घेऊ.
उसाचा रस पिण्याचे फायदे
1. उसाच्या रसात असलेले अँटी ऑक्सिडेंट आणि फोटोप्रोटेक्टिव्ह तत्व शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवतात. त्यामुळे उन्हाळ्यात वायरल इन्फेकशनपासून आपले रक्षण होते आणि आजार दूर राहतात.
2. उन्हाळ्यात अनेकांना डिहाइड्रेशनचा त्रास होतो. ज्यामुळे जेवण पचण्यास अडचण येते. अशावेळी उसाच्या रसाचे सेवन केल्यास डिहाइड्रेशनचा त्रास दूर होतो.
3. मधुमेह असलेल्या व्यक्ती उसाच्या रसात अधिक साखरेचे प्रमाण असल्याने तो पिणे टाळतात. मात्र उसाच्या रसात आइसोमाल्टोज नावाचा घटक असतो. जो शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो.
4. उन्हाळ्यात शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने ग्लुकोज घटते. अशावेळी थकवा जाणवतो. यावेळी उसाचा रस पिल्यास त्यातील कार्बोहायड्रेट शरीरातील ऊर्जा वाढवण्यास मदत करतात.
5. उसाच्या रसात डाइट्री फायबर घटक भरपूर असतो, त्यामुळे उसाच्या रसाचे उन्हाळ्यात अधून मधून सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत मिळते.