मदर डेअरीने आपल्या दूधांच्या उत्पादनांवरील दर 2 रुपयांपर्यंत वाढवले आहेत. रविवारपासून हे दर लागू होतील. दूधाचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट मात्र कोलमडले आहे. अमूलने दरवाढ केल्यानंतर आता मदर डेअरीनेही दूधाच्या दरात वाढ केली आहे.

मदर डेअरचे दर 6 मार्चपासून लागू होणार असून नव्या दरानुसार मदर डेअरीच्या गायीच्या दूधाचे दर 51 रुपये प्रति लिटर झाले आहे. तर डेअरी टोन दूध 49 रुपये प्रति लिटर झाले असून ते 47 रुपये प्रति लिटर होते. मदर डेअरीचे डबल टोन दूध 43 रुपये, तर फूल क्रीम दूध 59 रुपये झाले आहे. यापूर्वी अमूल दूधने दरवाढ केली असून. ती 1 मार्चपासून लागू झाली. अमूलने दूधाच्या दरात 2 रुपये दरवाढ केली आहे.